उगाऱ साखर कारखान्यावर पर्यावरण प्रदूषणाचे आरोप करून कारखाना बंद पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत कामगार आणि शेतकऱ्यांनी कारखान्याच्या समर्थनार्थ आंदोलन केले.


उगाऱ साखर कारखान्याच्या समर्थनार्थ कामगार संघटना, शेतकरी आणि नागरिकांनी मोर्चा काढत प्रदूषणाच्या आरोपांचा निषेध केला. काही व्यक्तींकडून जल व वायू प्रदूषण नियंत्रण मंडळांकडे करण्यात आलेल्या तक्रारींमुळे कारखान्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत, कारखान्यामुळे परिसराच्या विकासाला आणि रोजगाराला चालना मिळाल्याचे कामगार नेत्यांनी सांगितले. तसेच उगाऱ कारखान्यावर हजारो कामगार आणि शेतकरी अवलंबून असून, काही व्यक्तींकडून प्रदूषणाच्या मुद्द्यावर दबाव निर्माण होत असल्याचा आरोपयावेळी करण्यात आला.

उगाऱ नगरपालिकेने कारखान्यामुळे प्रदूषण होत नसल्याचा ठराव मंजूर केला असून, काही व्यक्ती दबाव निर्माण करण्यासाठी तक्रारी करत असल्याचा आरोप नगरसेवक अशोक कांबळे यांनी केला.
शेतकरी नेते वीरभद्र कटगेरी यांनी उगाऱ साखर कारखाना शेतकरी आणि कामगारांसाठी महत्त्वाचा आधार असल्याचे सांगत, कारखान्याच्या समर्थनाची भूमिका स्पष्ट केली.
या आंदोलनात माजी अध्यक्ष विजय यादव, महादेव उळ्ळागड्डी, नजीर टोपिवाले, अमूल कामत, शंभू जोशी, अप्पासाहेब वाळी, नगरपालिकेचे उपाध्यक्ष सतीश जगताप, सदस्य महादेव वडगावे, राजू पाटील, प्रताप जत्राटी, विकास धनगर, रोहन नाईक यांच्यासह नगरपालिकेचे सदस्य, महिला प्रतिनिधी आणि शिक्षण संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
निवेदन स्वीकारल्यानंतर तहसीलदार रवींद्र हदिमनी यांनी हा विषय वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्याचे आश्वासन दिले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पीएसआय राघवेंद्र खोत यांच्या नेतृत्वाखाली पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.


Recent Comments