कागवाड तालुक्यातील उगार येथील श्री पद्मावती मंदिरात श्रावणातल्या शेवटच्या शुक्रवारी विशेष पूजा पार पडली. याप्रसंगी सीमाभागासह कर्नाटक व महाराष्ट्रातून आलेल्या हजारो भाविकांनी देवीचे दर्शन घेतले.

उगार येथील पद्मावती मंदिरात श्रावण महिन्यातील पाचही शुक्रवारी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या पवित्र दिवसांत नवस फेडण्यासाठी दोन्ही राज्यांतून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहतात.

श्रावणातल्या शेवटच्या शुक्रवारी मंदिर प्रमुख शीतलगौडा पाटील आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत अर्चक अशोक उपाध्ये यांच्या पौरोहित्याखाली जलाभिषेक, कुंकुमार्चन, पंचामृत अभिषेक व ओटी भरणे हे धार्मिक विधी पार पडले.

या विशेष पूजेचा आणि महापूजा विधीचा लाभ घेण्यासाठी मंदिर परिसरात भाविकांची मोठी उपस्थिती होती.


Recent Comments