तंजावर येथे २३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या सरफोजीराजे भोसले द्वितीय मराठी साहित्य संमेलनासाठी विशेष अतिथी म्हणून निमंत्रित झाल्याबद्दल सीमाकवी रवींद्र पाटील सर यांचा श्री शिवबा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, जीवननगर-कुद्रेमानी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष विनोद विष्णू पन्हाळकर, सचिव हणमंत पन्हाळकर, कार्याध्यक्ष परशराम काकतकर, वैजनाथ कागणकर, रवळू गुरव, मारुती कडलगेकर यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

या सन्मानाबद्दल रवींद्र पाटील यांनी मंडळाचे आभार मानले. तंजावरच्या ऐतिहासिक भूमीत सीमाभागातील मराठी साहित्याचा आवाज पोहोचविण्याची संधी मिळणे ही अभिमानाची बाब आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.


Recent Comments