एक डॉक्टर एका रुग्णाचा जीव वाचवू शकतो, एक अभियंता भव्य इमारत उभारू शकतो, परंतु शिक्षक संपूर्ण समाजाची उभारणी करण्याचे काम करतात, असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केले.


म्हैसूर जिल्ह्यातील पेरियापट्टण येथील आदिचुंचनगिरी समुदाय भवनात आयोजित ‘शिक्षक दिन व गुरुवंदना सोहळा २०२६’ मध्ये त्या बोलत होत्या. रोबोट किंवा आधुनिक तंत्रज्ञान विद्यार्थ्यांना केवळ माहिती आणि धडे देऊ शकते, परंतु संस्कार, आदर, नैतिकता आणि मानवी मूल्ये शिकवण्याचे कार्य केवळ शिक्षकच करू शकतात, असे त्या म्हणाल्या.


या सोहळ्यास माजी मंत्री व आमदार के. व्यंकटेश, आमदार श्री गणेश, पीएलडी बँक अध्यक्ष राजण्णा, केपीसीसी सदस्य अनिल कुमार, तहसीलदार निसर्ग प्रिय, गट शिक्षण अधिकारी रवीप्रसन्न यांच्यासह प्रशासकीय अधिकारी व शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments