बळ्ळारीमध्ये प्रामाणिकपणाचे उत्तम उदाहरण समोर आले असून, सकाळी फिरताना सापडलेले ४० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र रुक्मिणम्मा नावाच्या ज्येष्ठ महिलेने मूळ मालकाला परत केले आहे.

बळ्ळारीतील डॉलर्स कॉलनी परिसरात रुक्मिणम्मा नेहमीप्रमाणे सकाळी फिरण्यासाठी गेल्या असताना त्यांना रस्त्यावर दागिन्यांची पिशवी सापडली. त्यांनी ती घरी आणून बँक कर्मचारी असलेल्या मंजुनाथ या आपल्या मुलाला दिली. पिशवीवरील माहितीच्या आधारे बँक व्यवस्थापकांच्या मदतीने मूळ मालक वसंत एच. यांचा शोध घेण्यात आला. वसंत यांनी आपल्या पत्नीचे दुरुस्तीसाठी आणलेले सोन्याचे मंगळसूत्र खिशातून गमावले होते.

सुरवातीला फोन करून माहिती दिली असता ऑनलाइन फसवणूक असावी असा संशय आल्याने वसंत यांनी याकडे दुर्लक्ष केले होते. मात्र, रुक्मिणम्मा यांच्या कुटुंबाने पुन्हा संपर्क साधून खात्री पटवून दिल्यानंतर वसंत यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन दागिने सुरक्षितपणे ताब्यात घेतले. आजच्या काळातही एवढ्या मौल्यवान दागिन्यांची परतफेड करणाऱ्या रुक्मिणम्मा यांच्या प्रामाणिकपणाबद्दल वसंत यांनी कृतज्ञता व्यक्त केली.


Recent Comments