Bagalkot

बागलकोट: जे के सिमेंट प्रकल्प तातडीने बंद करण्याची मागणी

Share

लोकापूर जवळील मुद्धापूर येथील जे के सिमेंट कारखान्यातील एएफआर युनिटमुळे होणाऱ्या प्रदूविरोधात शेतकरी आक्रमक झाले आहेत. या प्रकल्पाच्या विरोधात शेकडो शेतकऱ्यांनी बागलकोट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत तीव्र रोष व्यक्त केला.

कारखान्यात प्लॅस्टिक आणि घातक कचऱ्याचा इंधन म्हणून वापर केला जात असल्याने परिसरात गंभीर वायुप्रदूषण पसरत आहे, असा आरोप शेतकऱ्यांनी केला. या प्रदूषणामुळे शेतीचे नुकसान होत असून नागरिक आणि जनावरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रशासनाने याप्रकरणी तातडीने पावले उचलून कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.

यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रकरणी चौकशीचे आश्वासन दिले होते, मात्र अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही, अशी नाराजी आंदोलकांनी व्यक्त केली. नियमभंग करणाऱ्या या प्रकल्पाची परवानगी रद्द करून युनिट तात्काळ बंद करावे, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे एका शेतकऱ्याने सांगितले.

Tags: