State

मेकेदाटू अन् म्हादयी प्रकल्पांबाबत दिल्लीत महत्त्वाची बैठक

Share

नवी दिल्लीतील कर्नाटक भवनात उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यात राज्यातील मेकेदाटू व म्हादयी प्रकल्पांची सद्यस्थिती आणि धरणांमधील पाणीसाठ्याचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

या बैठकीत मेकेदाटू आणि म्हादयी प्रकल्पांची सद्यस्थिती, सर्वोच्च न्यायालयातील कायदेशीर लढ्याचे टप्पे तसेच राज्यातील प्रमुख धरणांमधील पाण्याचा साठा यावर सखोल चर्चा झाली. या दोन्ही महत्त्वपूर्ण योजनांच्या अंमलबजावणीतील अडसर दूर करून काम वेगाने पुढे नेण्याबाबत बैठकीत रणनीती आखण्यात आली.

या उच्चस्तरीय सलोखा बैठकीस परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी, दिल्लीतील कर्नाटक सरकारचे विशेष प्रतिनिधी टी.बी. जयचंद्र, ॲडव्होकेट जनरल शशिकिरण शेट्टी, अप्पर मुख्य सचिव गौरव गुप्ता, मुख्यमंत्र्यांचे सचिव नकुल आणि तांत्रिक सल्लागार जयप्रकाश यांच्यासह कायदे व जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते, असे राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात आले.

Tags: