Dharwad

धारवाड कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे आंदोलन तीव्र

Share

कृषी विभागातील अधिकारी पदांच्या भरतीसाठी केईएने काढलेल्या अधिसूचनेविरोधात धारवाड कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलन छेडले आहे.

कर्नाटक परीक्षा प्राधिकरणाने (केईए) ९४५ कृषी अधिकारी पदांसाठी बी.एससी आणि बी.टेक विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची संधी दिल्याने विद्यार्थ्यांनी सरकारविरोधात संताप व्यक्त केला आहे.

गेल्या १३ दिवसांपासून सातत्याने आंदोलन करूनही शासनाकडून कोणताच प्रतिसाद न मिळाल्याने विद्यार्थ्यांनी विद्यापीठाचे मुख्य प्रवेशद्वार बंद करून वाहतूक व प्रवेश रोखला.

परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून हुबळी-धारवाडचे पोलीस आयुक्त एन. शशिकुमार यांनी घटनास्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

विद्यार्थी आपल्या मागण्यांवर ठाम असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Tags: