Khanapur

कक्केरी ते धारवाड नवीन बस सेवा सुरू; कक्केरीमध्ये उत्साहाचे वातावरण!

Share

स्थानिक गावकऱ्यांच्या दीर्घकालीन मागणीची दखल घेत कक्केरी ते धारवाड नवीन बस सेवा सुरू करण्यात आली आहे.

खानापूर तालुक्यातील बिष्टादेवी मंदिरासमोर झालेल्या कार्यक्रमात पीकेपीएस अध्यक्ष यल्लाप्पा गुपित यांनी बस सेवेचा शुभारंभ केला.

अखिल कर्नाटक शेतकरी संघाचे राज्य उपाध्यक्ष किशोर मिठारी आणि शेतकरी नेत्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे हलियाळ आगाराची ही नवीन बस सुरू झाली आहे.

या वेळी किशोर मिठारी यांनी मलप्रभा नदीवर धरण बांधून तालुक्यात सिंचनाची सोय करावी, कक्केरी येथे शासकीय महाविद्यालय, ३० खाटांचे रुग्णालय, उपपोलीस ठाणे मंजूर करावे आणि पावसामुळे राज्य दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना प्रति ॲकर ३० हजार रुपये भरपाई द्यावी, अशी मागणी केली.

या कार्यक्रमात बिष्टाप्पा केदारजी यांनी पूजा केली, तर बस चालक यल्लाप्पा दोडमणी आणि वाहक शिवानंद तेली यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी अनेक स्थानिक मान्यवर व गावकरी उपस्थित होते.

Tags: