कर्नाटक राज्य दिव्यांग व पालक महासंघाच्या विजापूर जिल्हा समितीची बैठक नुकतीच पार पडली.


बैठकीत अलीकडेच दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आणि विधवा पेन्शनसाठी झालेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या सर्वांचे आभार मानण्यात आले.

या वेळी कर्नाटक राज्य पदवीधर महासंघाचे अध्यक्ष लायाप्पा इंगळे यांनी संविधानाच्या कलम ३७१ (जे) बाबत माहिती दिली. विजापूर जिल्ह्याला ३७१ (जे) विशेष आरक्षणातून वगळणे हा जिल्हयातील जनतेवर झालेला अन्याय असून, त्यासाठी सतत संघर्ष करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला जिल्हा अध्यक्ष विनोद एम. खेड, उपाध्यक्ष मल्लिकार्जुन उमराणी, रमेश बिरादार, लोकनाथ सरोडी, संतोष कलगुडी, अमण्णा गुन्नापूर, अनिल पवार, रफीक पवार, राजू कुमटगी, राजू तडगली, शंकरम्मा कोरी, गणेश डोणूर यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.


Recent Comments