बेळगावमधील एच.डी. कुमारस्वामी लेआउट येथील ज्येष्ठ नागरिक कल्याण संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा शिवालयात व्ही. जी. निरलगीमठ यांच्या अध्यक्षतेखाली यशस्वीपणे पार पडली.

सभेत परिसराचा विकास आणि कौटुंबिक समस्या सोडवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या सभेला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले संस्थापक सदस्य रुद्रप्पा बेतूर, योगेश तळवार आणि पंच कमिटीचे अध्यक्ष अरविंद जोशी यांनी संघाच्या कामकाजाचे कौतुक केले.
अध्यक्षीय भाषणात व्ही. जी. निरलगीमठ म्हणाले की, प्रत्येक सदस्याचे कल्याण आणि कौटुंबिक प्रश्न परस्पर सहकार्याने सोडवले जातील.
प्रारंभी सचिव सी. बी. संगोळी यांनी स्वागत करून अहवाल वाचन केले, तर ज्येष्ठ सदस्य वीरण्णा कलोळी यांनी संघाच्या ध्येयधोरणांची माहिती दिली. शेवटी एस. सी. गंगापूर यांनी आभार मानले.


Recent Comments