Chikkodi

बेळगावात पोटासाठी पत्नीने ओढला नांगर

Share

बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील नणदिवाडी येथे शेतीची मशागत करण्यासाठी पैसे नसल्याने एका शेतकऱ्याने आपल्या पत्नीच्या मदतीने शेत नांगरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

नणदिवाडी येथील शेतकरी केदारी नाईक आणि त्यांच्या पत्नी कविता यांच्याकडे तीन एकर शेती आहे. पावसाळा सुरू झाल्याने पेरणीपूर्वी शेताची मशागत करणे गरजेचे होते. मात्र ट्रॅक्टर किंवा बैल भाड्याने घेण्यासाठी पैसे नसल्याने या दांपत्यासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला होता.

पेरणीची वेळ निघून जाऊ नये म्हणून कविता नाईक यांनी स्वतः नांगर ओढला, तर पती केदारी नाईक यांनी मागून नांगर धरून शेताची नांगरणी केली. अत्यंत बिकट परिस्थितीतही शेती करण्याची जिद्द या दांपत्याने दाखवून दिली आहे.

या प्रकारावर स्थानिक नागरिकांनी तीव्र आश्चर्य व्यक्त केले असून शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या शासकीय योजना कागदावरच राहिल्या आहेत का, असा प्रश्न उपस्थित केला आहे.

शासनाने आणि कृषी विभागाने अशा गरजू शेतकरी कुटुंबाची तातडीने दखल घेऊन त्यांना योग्य ती मदत करावी, अशी मागणी होत आहे.

डी. के. उप्पार, इन न्यूज, चिक्कोडी

Tags: