नीट परीक्षेतील गैरव्यवहाराच्या निषेधार्थ आणि बाधित विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हुबळीयेथील किम्स-गांधी चौकात हजारो विद्यार्थ्यांनी एकत्र येत तीव्र निदर्शने केली.


आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी केंद्र सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली. शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर दिल्लीत झालेल्या कारवाईचा निषेध नोंदवण्यात आला.


विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ सुरू असल्याचा आरोप करत, आंदोलकांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तसेच परिसरात निदर्शने करत केंद्र सरकारच्या धोरणांचा विरोध दर्शवला, असे आंदोलक विद्यार्थ्यांनी सांगितले.



Recent Comments