Dharwad

धारवाडजवळ सरकारी बस उलटून महिलेचा मृत्यू

Share

धारवाड शहराच्या वेशीवर मरेवाडजवळ सरकारी बस उलटून झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, धारवाडहून सावदत्तीच्या दिशेने जाणारी वायव्य रस्ते वाहतूक महामंडळाची बस मरेवाड गावाजवळ अचानक उलटली. या अपघातात २५ हून अधिक प्रवासी जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिकांद्वारे सर्व जखमींना तातडीने धारवाड येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच धारवाड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून पाहणी केली. हा अपघात नेमका कशामुळे झाला याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Tags: