धारवाडमधील एका पाच वर्षांच्या बालकाने खेळता खेळता स्वतःच्या नाकात घड्याळाचा छोटा गोल सेल घालून घेतला होता. डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया करून हा सेल सुरक्षितपणे बाहेर काढल्याने बालकाचे प्राण वाचले असून कुटुंबीयांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.

धारवाडमधील या पाच वर्षांच्या मुलाने नाकात सेल घालून काही दिवस उलटले होते. त्यानंतर मुलाने नाक दुखत असल्याची तक्रार केल्यावर पालकांनी त्याला धारवाडमधील खाजगी डॉक्टर डॉ. अनिकेत पांडुरंग यांच्याकडे उपचारासाठी नेले.

डॉक्टरांनी बालकाच्या नाकाची तपासणी केली असता, नाकात काहीतरी अडकल्याचा संशय त्यांना आला. त्यानंतर तातडीने शस्त्रक्रिया करून नाकातून ती वस्तू बाहेर काढण्यात आली, तेव्हा तो घड्याळात वापरला जाणारा छोटा सेल असल्याचे स्पष्ट झाले. या मुलाने खेळताना स्वतःच्या उजव्या नाकपुडीत हा सेल कोंबली होता. या घटनेमुळे लहान मुलांच्या हाती खेळण्यासाठी छोट्या वस्तू देण्यापूर्वी पालकांनी अत्यंत काळजी घेणे गरजेचे असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.


Recent Comments