मतदार यादी पुनरिक्षण मोहिमेअंतर्गत धारवाड जिल्ह्यात ‘एसआयआर’ अर्ज वाटपाचे काम वेगात सुरू आहे. मतदारांनी आपले पूर्ण भरलेले अर्ज विहित मुदतीत संबंधित बीएलओंकडे जमा करावेत, अशी सूचना धारवाडच्या जिल्हाधिकारी आर. स्नेहल यांनी दिली आहे.

पत्रकार परिषदेत माहिती देताना जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, धारवाड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण १,६६५ मतदान केंद्रे आहेत. सर्व बीएलओंद्वारे अर्ज वाटपाचे काम सुरू असून आतापर्यंत ९३.६९ टक्के अर्जांचे वाटप पूर्ण झाले आहे. जिल्ह्यात एकूण १६,२१,९६१ मतदार असून, त्यापैकी ३,३३,७६५ मतदारांनी भरलेले अर्ज परत केले आहेत. परत आलेल्या अर्जांचे संगणकीकरण सुरू असून आतापर्यंत २०.५८ टक्के काम पूर्ण झाले आहे. हे अर्ज जमा करण्यासाठी चालू महिन्याची २९ तारीख शेवटची मुदत असून सर्व मतदारांनी वेळेत सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.



Recent Comments