खानापूर तालुक्यातील हत्तरगुंजी गावातील श्री ज्ञानेश्वर माउली मंदिराचे नूतनीकरण करण्यात आले असून, माजी आमदार तथा बीडीसीसी बँकेचे संचालक अरविंद पाटील यांनी मंदिराला भेट देऊन विशेष पूजा केली आहे.

हत्तरगुंजी येथील श्री ज्ञानेश्वर माउली मंदिराच्या नूतनीकरणानंतर अरविंद पाटील यांनी मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेतले आणि पूजा केली. मंदिराच्या भव्य नूतन वास्तूची पाहणी करून त्यांनी समाधान व्यक्त केले. या प्रसंगी त्यांनी आपल्या वतीने मंदिराला देणगी देखील दिली.

या वेळी अरविंद पाटील यांनी मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. मंदिराच्या कामात सहकार्य केल्याबद्दल मंदिर समितीच्या वतीने अरविंद पाटील यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी गावातील प्रमुख नागरिक आणि भाविक उपस्थित होते.

अल्ताफ एम. बसरीकट्टी
इन न्यूज
खानापूर


Recent Comments