Chikkodi

चिक्कोडीतील प्रसिद्ध कारदगा दर्ग्यात शिरले पुराचे पाणी

Share

चिक्कोडी तालुका आणि सीमाभागात गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे दूधगंगा नदीच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली आहे. नदीचे पाणी पात्राबाहेर पडल्याने निपाणी तालुक्यातील कारदगा येथील प्रसिद्ध पीर बंगाली बाबा दर्ग्यामध्ये पुराचे पाणी शिरले आहे.

दर्ग्याच्या आवारात आणि अंतर्गत भागात पाणी साचल्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय झाली असून, सुरक्षेचा उपाय म्हणून सध्या दर्शन पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. भाविकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने दर्ग्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर बॅरिकेड्स लावून हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केला आहे.

परिसरात पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास कारदगा गावातील निवासी भागातही पाणी शिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण असून प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Tags: