धारवाड येथील कोर्ट सर्कलजवळ भरधाव वेगाने आलेल्या एका कारचे चालकावरील नियंत्रण सुटल्याने कार थेट बीआरटीएस रस्त्यावरील बॅरिकेडला जाऊन धडकली. काल रात्रीच्या सुमारास झालेल्या या अपघातात कारच्या पुढच्या भागाचे मोठे नुकसान झाले आहे.

कार बॅरिकेडवर वेगाने आदळल्याने हा अपघात झाला. मात्र, सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अपघाताची माहिती मिळताच धारवाड वाहतूक पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

रस्त्यावर अडकलेली कार बाजूला काढण्यासाठी पोलिसांना बरेच प्रयत्न करावे लागे. या अपघातात काही जण किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


Recent Comments