हुक्केरी शहरातील कोष्टी कल्याण मंडपामध्ये तरुण लेखक एम. एस. होळीमठ लिखित ‘राज्यशास्त्र आणि राजकीय सिद्धांत’ या ग्रंथाचा लोकार्पण सोहळा पार पडला. अडवी श्री प्रकाशन आणि हुक्केरी तालुका कन्नड साहित्य परिषदेच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


वीरक्त मठाचे शिवबसवा महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात आणि निवृत्त प्राचार्य सतीश गवती यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. तत्पूर्वी, वाद्यांच्या गजरात आणि पारंपरिक पद्धतीने या ग्रंथाची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी साहित्यिक आणि परिसरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


हा ग्रंथ मूळ इंग्रजीतून कन्नडमध्ये अनुवादित करण्यात आला असून प्लेटो, ॲरिस्टॉटल, कार्ल मार्क्स यांच्यापासून ते आधुनिक राजकीय विचारवंतांच्या सिद्धांतांचा यात समावेश आहे. सीमाभागातील पदवी आणि स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा ग्रंथ अत्यंत मार्गदर्शक ठरेल, अशी प्रतिक्रिया लेखक मल्लिकार्जुन होळीमठ यांनी दिली.



Recent Comments