केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी तातडीने स्वतंत्र शेतकरी प्राधिकरण स्थापन करावे, अशी मागणी कर्नाटक राज्य शेतकरी संघटनेचे अध्यक्ष चूनप्पा पुजारी यांनी केली आहे.

दरवर्षी शेतकरी दुष्काळ किंवा अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान सोसत आहेत. कर्ज काढून केलेली पेरणी वाया गेल्याने शेतकरी आत्महत्या करत आहेत. सरकारी मदत मिळण्यास होणारा विलंब टाळण्यासाठी आणि शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी या प्राधिकरणाची स्थापना करून पुरेसा निधी द्यावा, असे चूनप्पा पुजारी यांनी सांगितले.

राजू बागलकोटी
इन् न्यूज, हुक्केरी.


Recent Comments