Hukkeri

हुक्केरीमध्ये ज्योती पूजेचे आयोजन; सकारात्मक ऊर्जा वाढवण्याचे आवाहन

Share

ज्योती पूजा केल्याने प्रत्येकामध्ये आणि घरात सकारात्मक ऊर्जा वाढते, असे प्रतिपादन बेळगावच्या ज्योती पूजा मंडळाच्या प्रवक्त्या गौरी दिवटार यांनी केले.

हुक्केरी शहरातील रवदी फार्म हाऊस येथे ज्योती पूजा आणि त्याचे महत्त्व या विषयावर आयोजित एक दिवसीय कार्यशाळेत गौरी दिवटार बोलत होत्या. जगातील महत्त्वाच्या सातही धर्मांचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या मडियाळ क्षेत्रात गेल्या शंभर वर्षांपासून दररोज ज्योती पूजा केली जाते, अशी माहिती त्यांनी दिली. बेळगाव जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील इच्छुक महिलांना ज्योती पूजेचे नियम सांगून घरात सकारात्मक ऊर्जा कशी निर्माण करावी, याचे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले.

या प्रसंगी हुक्केरी ज्योती पूजा व सत्संग महामंडळाच्या महानंदा पाटील, उषा रवदी, मायक्का, महादेवी पाटील, संकन्नवर, बाळकृष्ण कोळेकर, विजय रवदी यांच्यासह बेळगाव, संकेश्वर आणि हुक्केरी येथील सत्संग व पतंजली समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.

राजू बागलकोटे, इन न्यूज हुक्केरी.

Tags: