हुक्केरी तालुक्यातील संकेश्वर येथील हिरण्यकेशी सहकारी साखर कारखान्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी जिल्हा प्रशासनाने कारखान्याला टाळे ठोकले आहे.



पर्यावरण नियमांचे पालन न केल्यामुळे कर्नाटक राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निर्देशानुसार बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात आली. हुक्केरीचे तहसीलदार बलराम कट्टीमणी यांच्या नेतृत्वाखाली पर्यावरण नियंत्रण अधिकारी, हेस्कॉम इंजिनिअर आणि पोलीस प्रशासनाने कारखान्यात संयुक्त मोहीम राबवून साखर उत्पादन युनिट आणि डिस्टिलरी घटकांचे कंट्रोल पॅनेल सील केले.


राजू बागलकोटी
इन् न्यूज, हुक्केरी.


Recent Comments