खानापूर तालुक्यातील जामगाव येथे मुसळधार पावसामुळे एक मोठे झाड विजेच्या खांबांवर आणि तारांवर कोसळल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे.

या घटनेमुळे गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण परिसर अंधारात असून हेस्कॉम (HESCOM) अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कारभाराविरोधात नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

सततच्या पावसामुळे रस्त्याशेजारील झाड उन्मळून पडल्याने विजेचे खांब तुटले असून वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून ग्रामस्थांनी स्वतः पुढाकार घेत रस्त्यावरील झाड बाजूला करून वाहतूक पूर्ववत केली. मात्र दोन दिवस उलटूनही वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली नसल्याचे स्थानिकांनी सांगितले.
परिसरात वीज नसल्यामुळे शालेय विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. संबंधित प्रशासनाने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन तुटलेले खांब आणि वीजवाहिन्यांची दुरुस्ती करावी, तसेच गावातील वीजपुरवठा त्वरित सुरू करावा अशी मागणी जामगावच्या नागरिकांनी केली आहे.


Recent Comments