Khanapur

कक्केरी गावात धर्मांतराच्या प्रयत्नाचा आरोप

Share

खानापूर तालुक्यातील कक्केरी गावात गरीब कुटुंबांना आमिष दाखवून ख्रिश्चन धर्मात परिवर्तित करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप समोर आला आहे.

नंदगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कक्केरी गावात एका घरात प्रार्थना सुरू असताना हा प्रकार घडला. कार्यकर्त्यांनी या प्रसंगाचे चित्रीकरण करत आक्षेप घेतला, त्यानंतर तेथे उपस्थित असलेले संशयित निघून गेले. बजरंग दलाने या बेकायदेशीर धार्मिक कृत्याची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

घटनेची माहिती मिळताच नंदगड पोलिसांनी तत्परतेने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यादरम्यान, आपण कोणत्याही प्रकारे धर्मांतर केलेले नाही, अशी माहिती संबंधित कुटुंबाने पोलिसांना दिली. अशा घटना पुन्हा घडल्यास त्वरित संपर्क साधण्याच्या सूचना देऊन पोलीस परतले. या घटनेची माहिती मिळताच बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी संबंधित ठिकाणी जात विचारणा केली असता तेथे काही काळ तणाव निर्माण झाला होता.

Tags: