राज्यातील सध्याची पावसाची परिस्थिती पाहता संपूर्ण राज्य दुष्काळग्रस्त घोषित करून शासनाने शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी विजापूर जिल्हा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अरविंद कुलकर्णी यांनी केली आहे.

विजापूर शहरात बोलताना त्यांनी सांगितले की, राज्यातील पाणीटंचाईची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. जलाशयांमध्ये केवळ पिण्याच्या पाण्यासाठीच साठा राखीव ठेवण्याची वेळ आल्याचे सूचक विधान प्रशासनाकडून करण्यात आले आहे. कावेरी आणि कृष्णा खोऱ्यातील प्रमुख धरणांमध्ये पाण्याची आवक घटल्याने शेतीसाठी पाणी सोडणे आव्हानात्मक बनले आहे.

जून महिना संपून जुलैचा पहिला आजवडा उजाडला तरी अनेक भागांत पुरेसा पाऊस झालेला नाही, त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांच्या पेरण्या रखडल्या आहेत. अशा कठीण प्रसंगात शासनाने विलंब न करता दुष्काळी उपाययोजना राबवून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे, असे त्यांनी म्हटले आहे.


Recent Comments