चिकोडी तालुक्यातील विजयनगर आणि जागनूर येथून कब्बूर गावाला जोडणारा रस्ता पूर्णपणे खराब झाला असून वाहनचालक आणि नागरिकांना दैनिक प्रवासात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

रस्त्याच्या या दुरवस्थेला कंटाळून लक्ष्मण यड्रान्वी नावाच्या एका तरुणाने त्याच रस्त्यावरील पाण्याच्या खड्ड्यात उभे राहून व्हिडिओ तयार केला आणि रायबागचे आमदार दुर्योधन ऐहोळे यांच्याकडे रस्ता दुरुस्तीची मागणी केली. रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून तलावाचे स्वरूप आल्याने प्रवाशांमध्ये तीव्र असंतोष आहे.

विजयनगर-जागनूर ते कब्बूर जोडणारा हा मुख्य मार्ग आहे. मात्र, अलीकडे झालेल्या पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहतूक कठीण झाली आहे. दुचाकीस्वार, शालेय विद्यार्थी आणि शेतकऱ्यांना काळजीपूर्वक प्रवास करावा लागत आहे. या रस्त्याकडे लक्ष देऊन नागरिकांचे हाल थांबवावेत, अशी मागणी करणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्याला नागरिकांमधून मोठा पाठिंबा मिळत आहे. लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी आतातरी रस्ता तातडीने दुरुस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.
डी. के. उप्पार, इन न्यूज चिकोडी


Recent Comments