विजापूर जिल्ह्यातील इंडि येथील उपनिबंधक कार्यालयावर लोकायुक्त अधिकाऱ्यांनी बुधवारी संध्याकाळी अचानक छापा टाकला. या तपासणी दरम्यान कार्यालयात सुमारे ५० हजार रुपयांची बेहिशोबी रक्कम आढळून आली आहे.


विजापूर जिल्हा लोकायुक्त पोलीस अधीक्षक टी. मल्लेशी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिबंधक कार्यालय आणि विवाह नोंदणी अधिकारी कार्यालयात एकाच वेळी ही कारवाई करण्यात आली.

लोकायुक्त डीवायएसपी मल्लिकार्जुन तुळशीगेरी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कार्यालयातील कागदपत्रे आणि रकमेची तपासणी केली. जप्त केलेल्या ५० हजार रुपयांच्या स्रोताबाबत अधिकारी माहिती गोळा करत आहेत. कारवाई दरम्यान कार्यालयात उपस्थित असलेल्या काही खाजगी व्यक्तींचीही चौकशी करण्यात आली. तसेच बॉण्ड रायटर्सकडील फाईल्स आणि दस्तऐवज तपासण्यात आले असून महत्त्वाचे रेकॉर्ड ताब्यात घेण्यात आले आहेत. लोकायुक्त अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कागदपत्रांची पडताळणी पुढील दोन दिवस सुरू राहणार असून त्यानंतर अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
या मोहिमेत सीपीआय आनंद टक्कनवर, सीपीआय आनंद डोण्णी आणि लोकायुक्त कर्मचारी सहभागी झाले होते.


Recent Comments