Athani

अथणीत छापील किमतीपेक्षा जास्त दराने मद्य विक्री होत असल्याचा आरोप

Share

अथणी अबकारी विभागाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या मोळे ग्रामपंचायत हद्दीतील मद्यविक्री दुकानात एमआरपीपेक्षा अधिक दराने पैशांची वसुली केली जात असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे.

शासकीय नियमांनुसार दुकानात अधिकृत दरपत्रकाचा फलक लावणे बंधनकारक असतानाही नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचा आरोप स्थानिक ग्राहकांकडून होत आहे.

दुसरीकडे, बेळगावचे पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी अवैध मद्यविक्री विरोधात घेतलेल्या कडक निर्णयांचे जिल्ह्यात स्वागत होत आहे. मात्र, अबकारी विभाग बार मालकांवर ठोस कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप करत नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

Tags: