बेळगाव जिल्हा दौऱ्यावर असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री तथा महसूल मंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी बुधवारी कित्तूर येथील तालुका दंडाधिकारी कार्यालयाला भेट दिली.


जिल्हा दौऱ्याच्या सुरुवातीला उपमुख्यमंत्र्यांनी स्वातंत्र्य चळवळीतील वीरांगना राणी चिन्नम्मा आणि क्रांतीवीर संगोळी रायन्ना यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी तहसीलदार कार्यालयाच्या कामकाज पद्धतीची पाहणी केली. महसूल विभागामार्फत नागरिकांना कोणत्याही त्रासाशिवाय जलद गतीने कागदपत्रे आणि दाखले मिळावेत यासाठी डिजिटल आणि बायोमेट्रिक प्रणाली प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली असून, त्याचीच पाहणी करण्यासाठी ही भेट दिल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. कार्यालयात नव्याने सुरू करण्यात आलेल्या बायोमेट्रिक आणि संगणकीय डिजिटल प्रणालीची त्यांनी पाहणी केली आणि अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.


या प्रसंगी महसूल विभागाचे उच्च अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. महसूल आयुक्त मीना, महसूल विभागाचे पी.आर.एस. राजेंद्र कटारिया, बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, डीसीसी बँकेचे सदस्य नानासाहेब पाटील, तहसीलदार कलगौडा पाटील आणि डीएसपी डॉ. वीरय्या हिरेमठ आदींनी उपमुख्यमंत्र्यांसोबत उपस्थिती लावली.



Recent Comments