हुबळीवरून लक्ष्मणेश्वरकडे जाणाऱ्या राज्य परिवहन बसच्या खिडकीतून थुंकण्यासाठी डोके बाहेर काढलेल्या एका प्रवाशाचा टिपर ट्रकच्या धडकेमुळे जागीच मृत्यू झाला. कुंदगोळ शहरात ही हृदयद्रावक घटना घडली आहे.

हुबळी-लक्ष्मणेश्वर बसच्या शेवटच्या सीटवर बसून एक प्रवासी प्रवास करत होता. सायंकाळच्या सुमारास बस कुंदगोळ शहरात आली असता, तो प्रवासी थुंकण्यासाठी खिडकीतून डोके बाहेर काढत होता. याच वेळी मागून अतिवेगाने आलेल्या एका टिपर ट्रकने प्रवाशाच्या डोक्याला जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की प्रवाशाचे डोके धडावेगळे झाले आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. कुंदगोळ ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही दुर्घटना घडली असून, माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे आणि पुढील तपास सुरू केला आहे.



Recent Comments