गोकाक ग्रामीण पोलिसांनी दुचाकी चोरीच्या प्रकरणाचा छडा लावत दोन आरोपींना अटक करण्यात यश मिळवले आहे. अटक केलेल्या आरोपींकडून विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून चोरलेल्या चार लाख रुपये किमतीच्या एकूण आठ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यातील गोकाक ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तपास चक्र गतीने फिरवून मुथप्पा उर्फ मुत्तू बेळगली आणि यमनप्पा यल्लप्पा दोडमनी या दोन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी विविध भागांतून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून सर्व वाहने हस्तगत केली आहेत.

गोकाक ग्रामीण पोलीस ठाण्याच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अत्यंत समन्वयाने ही यशस्वी कामगिरी बजावली. अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता, त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.


Recent Comments