Khanapur

चिक्कअंग्रोळी येथील अमानवीय घटनेविरोधात खानापुरात दलित संघटनांचे आंदोलन

Share

खानापूर तालुक्यातील चिक्क अंग्रोळी गावात शाळकरी दलित मुलांसोबत घडलेल्या अस्पृश्यतेच्या प्रकाराचा निषेध करत विविध दलित संघटनांच्या हजारो कार्यकर्त्यांनी आज भव्य निषेध आंदोलन केले.

चिक्क अंग्रोळी गावात काही दिवसांपूर्वी एका सार्वजनिक कार्यक्रमात महाप्रसादादरम्यान दलित शाळकरी मुलांना दूर बसवून जेवण देण्यात आले होते. या अमानुष कृत्याविरोधात तालुक्यातील विविध दलित संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणासंदर्भात २३ जून २०२६ रोजी नंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, आरोपींना तातडीने अटक करावी या मागणीसाठी क्रांतीवीर संगोळी रायण्णा चौकात मानवी साखळी च्या माध्यमातून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे काही काळ वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली होती. त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेले बैलहोंगलचे डीवायएसपी आणि उपतहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आले.

या आंदोलनात राजशेखर हिंडलगी, उमेश कोलकार, शरद होन्ननायक, रायप्पा चलवादी, राघवेंद्र चलवादी, राजू कांबळे, ईरप्पा मादर, महांतेश पात्रदार, दुर्गप्पा चलवादी, बसवराज मादर, पुट्टू हवनवर, रवी मादर, शशिधर नायक, कल्लाप्पा तळवार, परशुराम मादर, उदय तळवार, चंद्रू मादर, कार्तिक तळवार, दयानंद आणि मारुती कांबळे यांच्यासह विविध दलित संघटनांचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: