Dharwad

धारवाड हायकोर्ट पीठाला पुन्हा एकदा बॉम्बची धमकी; हायकोर्ट परिसरात पोलिसांकडून कसून तपासणी

Share

धारवाड येथील मुम्मिगट्टी जवळील हायकोर्ट पीठाला वारंवार बॉम्बने उडवून देण्याची धमकी येत असल्याने हायकोर्ट परिसरातील सुरक्षा व्यवस्था कमालीची वाढवण्यात आली असून पोलिसांकडून कसून तपासणी केली जात आहे.

धारवाड हायकोर्ट पीठाला आतापर्यंत दोनदा ईमेलद्वारे बॉम्बची धमकी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर हायकोर्ट वकील संघटनेने गृहविभागाला पत्र लिहून सुरक्षा वाढवण्याची मागणी केली होती. त्यानुसार आता हायकोर्टाच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त ४० पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

न्यायालय परिसरात येणाऱ्या वकिलांची वाहने, कर्मचारी आणि पक्षकारांची गेटवरच कसून तपासणी केली जात आहे. जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत दोनदा अशा धमक्या आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. सध्या हायकोर्ट परिसरात श्वानपथक, शोध पथक आणि बॉम्बशोधक पथकाला तैनात करण्यात आले आहे.

Tags: