मान्सूनच्या पावसाने दगा दिल्यामुळे धारवाड जिल्ह्यातील नवलगुंद तालुक्यातील ब्याल्याळ गावातील शेतकरी प्रवीण यांनी हताश होऊन आपले उभे कांद्याचे पीक नष्ट केले असून शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

शेतकऱ्याने कर्ज काढून आपल्या दहा एकर शेतीत कांद्याची पेरणी केली होती. मात्र, पेरणीनंतर पाऊस न पडल्याने कडक उन्हामुळे पीक जळून गेले. यामुळे अत्यंत दुःखी झालेल्या शेतकऱ्याने स्वतःच्या हाताने पेरलेल्या पिकावर ट्रॅक्टर चालवून ते नष्ट केले. कांदा पिकासाठी प्रति एकर ३० ते ४० हजार रुपये खर्च झाला असून, केंद्र व राज्य सरकारने तातडीने मदतीला धावून यावे अशी मागणी त्यांनी केली.



Recent Comments