धारवाड तालुक्यातील लाळगट्टी गावात एका घरामध्ये हरणाची शिकार करून त्याचे शिजवल्याप्रकरणी साहाय्यक वनसंरक्षक सुनीता निंबरगी आणि त्यांच्या पथकाने तातडीने कारवाई करत घरातून संशयितांना ताब्यात घेतले.


वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, लाळगट्टी गावातील एका घरात हरीण मारून त्याचे मांस शिजवण्याची तयारी सुरू होती. या माहितीच्या आधारे साहाय्यक वनसंरक्षक सुनीता निंबरगी आणि सहकाऱ्यांनी लाळगट्टी येथील संबंधित घरावर अचानक छापा टाकला.

यावेळी घरात हरणाचे शीर आणि मांस शिजवले जात असल्याचे उघडकीस आले. या कारवाईदरम्यान वन विभागाने लाळगट्टी येथील फक्कडप्पा मडिवाळप्पा म्यागेरी आणि धारवाडच्या होसयल्लापूर येथील वासुदेव नायक या दोघांना ताब्यात घेतले आहे. घटनास्थळावरून हरणाचे मांस, एक गावठी बंदूक, दारूगोळा, फटाके आणि एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे, अशी माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली.


Recent Comments