Dharwad

धारवाडमध्ये मोहरंम निमित्त हिंदू-मुस्लिम बांधवांमध्ये धार्मिक सलोखा

Share

गामनगट्टी गावात गेल्या शेकडो वर्षांपासून दोन्ही समाजातील नागरिक एकत्र येऊन मोहरंम साजरा करतात. पाच दिवसांपूर्वी हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी एकत्र येत देवाच्या मूर्तींची प्रतिष्ठापना केली होती. या पाच दिवसांत दोन्ही समाजाचे नागरिक ‘फकीर’ बनून कडक नियम पाळतात, जी येथील एक आगळीवेगळी परंपरा आहे.

सणाच्या चौथ्या दिवशी हिंदू कुटुंबांकडून फकिरांसाठी विशेष महाप्रसादाचे आयोजन केले जाते. तर पाचव्या दिवशी देवाच्या मूर्तींची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत स्थानिक कलाकारांनी सादर केलेले पारंपरिक ‘जग्गलीगी’ ढोल नृत्य आणि मुलांचे ‘कोलाटा’ खेळ उपस्थितांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले होते.

मिरवणूक मार्गावर मुस्लिम बांधवांच्या वतीने सर्व भाविकांना सरबत आणि पाकाचे वाटप करण्यात आले. जाती-पातीचे भेद विसरून गावातील अबालवृद्ध आणि तरुणांनी या सलोख्याच्या परंपरेचा वारसा यंदाही उत्साहाने पुढे चालवला.

Tags: