Khanapur

खानापुरात ‘सहकार सप्ताह’ उत्साहात; वृक्षारोपणाने दिला पर्यावरणाचा संदेश

Share

केंद्र सरकारच्या सहकार मंत्रालयाच्या स्थापनेला पाच वर्षे पूर्ण झाल्याबद्दल देशभरात ‘सहकार सप्ताह’ साजरा केला जात आहे. याच निमित्ताने खानापूर येथील को-ऑपरेटिव्ह बँकेच्या आवारात “सहकारातून समृद्धीकडे” या संकल्पनेवर आधारित वृक्षारोपण कार्यक्रमाचे अत्यंत उत्साहात आयोजन करण्यात आले होते.

सहकार विभाग, कर्नाटक राज्य सहकार महामंडळ बंगळुरू, बेळगाव जिल्हा सहकार युनियन, बीडीसीसी बँक, सौहार्द संयुक्त सहकारी संस्था आणि द खानापूर को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून उपस्थित असलेले आमदार विठ्ठल हलगेकर आणि माजी आमदार तथा बीडीसीसी बँकेचे संचालक अरविंद पाटील यांनी संयुक्तपणे रोपटे लावून वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ केला. यावेळी विविध सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी झाडे लावून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला.

या प्रसंगी बोलताना आमदार विठ्ठल हलगेकर आणि अरविंद पाटील यांनी, सहकार चळवळीच्या माध्यमातून समाजाच्या सर्वांगीण विकासासोबतच पर्यावरणाचे रक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे आवाहन केले. सहकारी क्षेत्राच्या सामाजिक बांधिलकीची साक्ष देणारे हे कार्यक्रम आगामी काळात पर्यावरण संवर्धनाला अधिक गती देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. व्यासपीठावर अर्बन बँकेचे अध्यक्ष अमृत शेलार, मारुती पाटील, महांतेश कोडोळी, रवी काडगी, अंजली कोडोळी, देवप्पा गुरव यांच्यासह अनेक प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

Tags: