Hukkeri

हुक्केरी शहरात हिंदू-मुस्लिम सलोख्याने मोहरम साजरा

Share

हुक्केरी शहरात हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी एकत्र येत मोहरम सण पारंपरिक उत्साहात आणि सलोख्याने साजरा केला आहे. गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या या धार्मिक उत्सवाची विधीवत सांगता करण्यात आली.

या उत्सवानिमित्त हुक्केरी शहरात विविध ठिकाणी पंज्यांची स्थापना करून सामूहिक पूजा करण्यात आली होती. नवव्या दिवशी मिरज, गजबरवाडी आणि हुक्केरी येथील विविध पंज्यांची गळाभेट झाली. त्यानंतर पहाटे पारंपरिक पद्धतीने अग्नी प्रवेशाचा विधी पार पडला.

या उत्सवामध्ये दोन्ही समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. मोहरमच्या दहाव्या दिवशी संध्याकाळी पंज्यांचे नदीत विसर्जन करण्यात आले. या सणाचे औचित्य साधून नैवेद्यासाठी पारंपरिक गोड पदार्थ तयार करण्यात आले होते, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.

Tags: