बळ्ळारी जिल्ह्यातील कुडगोडू तालुक्यातील क्यादिगेहाळ गावात मोहरमच्या उत्सवादरम्यान अग्निकुंडात पडल्याने गंभीर भाजलेल्या एका युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. बळ्ळारी येथील विम्स रुग्णालयात त्याने अखेरचा श्वास घेतला.

देवराज असे मृत २८ वर्षीय युवकाचे नाव आहे. मोहरमच्या परंपरेनुसार एका हातात मशाल आणि दुसऱ्या हातात रॉकेलची बाटली घेऊन अग्निकुंडाभोवती फिरत असताना देवराजचा अचानक पाय घसरला आणि तो अग्निकुंडात पडला. तो पडताच हातातील रॉकेल सांडल्याने आगीचा भडका उडाला.

स्थानिक नागरिकांनी त्याला तातडीने बाहेर काढून उपचारासाठी बळ्ळारीच्या विम्स रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, गंभीररीत्या भाजल्यामुळे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी कुडगोडू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Recent Comments