बेळ्ळारी तालुक्यामध्ये मोहरम सण अत्यंत सलोख्याने आणि शांततापूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. जात, पात आणि धर्म विसरून सर्वधर्मीय नागरिक एकत्र आल्याने खाण पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेळ्ळारीमध्ये पुन्हा एकदा हिंदू-मुस्लिम सामाजिक ऐक्याचे दर्शन घडले.


सणाच्या निमित्ताने सर्वधर्मीय भाविकांनी पीर देवांच्या मशिदीला भेट देऊन साखर आणि मलिदा अर्पण केला. मोहरम सणाचे मुख्य आकर्षण असलेल्या अग्निकुंड मधील अग्नीला मीठ वाहून भाविकांनी पारंपरिक विधी मनोभावे पूर्ण केले.


या ऐतिहासिक परंपरेच्या पार्श्वभूमीवर, ढोल आणि हलगीच्या कडकडणाऱ्या तालावर तरुणांनी ठेका धरत आनंद साजरा केला. सर्वधर्मीय नागरिकांच्या उपस्थितीत कोणताही अनुचित प्रकार न घडता ही पारंपरिक मिरवणूक अत्यंत शांततेत पार पडली.


Recent Comments