Khanapur

मतदार यादीतील त्रुटी दूर करून अचूक नोंदणीसाठी विशेष मोहीम सुरू

Share

खानापूर तालुक्यातील मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यासाठी आणि पात्र मतदारांची अचूक नोंदणी करण्यासाठी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहीम राबविण्यात येत आहे. खानापूर तहसील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत मतदान नोंदणी अधिकारी बलराम चव्हाण यांनी ही माहिती दिली.

या मोहिमेत नियुक्त केलेले ३१२ बीएलओ ३० जून ते २९ जुलै या कालावधीत प्रत्येक मतदान केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या मतदारांच्या घरोघरी भेट देणार आहेत. मतदार ओळखपत्र, यादीतील नाव आणि पत्ता यांची प्रत्यक्ष पडताळणी यावेळी केली जाईल.

मतदारांनी बीएलओ भेटीदरम्यान रंगीत फोटोसह जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, पॅन कार्ड, आधार कार्ड किंवा मालमत्ता वाटप पत्र यांपैकी आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत. या मोहिमेला नागरिकांनी पूर्ण सहकार्य करावे, अशी विनंती बलराम चव्हाण यांनी केली आहे.

Tags: