Dharwad

धारवाड लोकायुक्तांची नवलगुंद नगरपालिका कार्यालयावर कारवाई

Share

धारवाड जिल्हा लोकायुक्तांच्या पथकाने नवलगुंद शहराच्या नगरपालिका कार्यालयावर अचानक छापा टाकला. लोकायुक्त डीवायएसपी यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या या पथकाने कार्यालयातील विविध विभागांच्या कपाटांची आणि महत्त्वाच्या फाईल्सची कसून पडताळणी सुरू केली आहे.

कारवाई दरम्यान लोकायुक्त अधिकाऱ्यांनी नगरपालिका कार्यालयात उपस्थित असलेल्या नागरिकांशी थेट संवाद साधला. नागरिक कोणत्या कामासाठी आले आहेत, त्यांचे काम किती दिवसांपासून प्रलंबित आहे आणि त्यांना विनाकारण हेलपाटे मारावे लागत आहेत का, याविषयीची सविस्तर माहिती अधिकाऱ्यांनी गोळा केली. ४ ते ५ वेगवेगळ्या गाड्यांमधून लोकायुक्त अधिकारी अचानक दाखल झाल्याने नगरपालिका वर्तुळात तसेच कामानिमित्त आलेल्या नागरिकांमध्ये काही काळ मोठी खळबळ उडाली होती.

Tags: