धारवाड जवळील तडसिकोप्प येथे जमीन विवादातून झालेल्या गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करण्यात विद्यागिरी पोलिसांना अखेर यश आले आहे.

गेल्या मे महिन्यात तडसिकोप्प येथील इटिगट्टी मार्गावर जमीन विवादातून गोळीबाराची घटना घडली होती. या घटनेत विठ्ठल नावाच्या व्यक्तीच्या पायाला गोळी लागली होती. पोलिसांनी यापूर्वीच फिलोमिना पॉल, प्रवीण सुतार, इंदरपाल, बेंजामिन आणि विशाल या पाच आरोपींना अटक केली होती.

गोळीबारानंतर मुख्य आरोपी सुंदर पॉल हा वेशांतर करून देशातील वेगवेगळ्या राज्यांत लपून बसला होता. अखेर तामिळनाडूतील नागपट्टीणम येथून विद्यागिरी पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची चौकशी पूर्ण करून त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.


Recent Comments