कॅनरा लोकसभा मतदार संघाचे खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी याची रविवारी दि.२१ रोजी खानापूरला धावती भेट झाली.
भेटीचे औचित्य साधुन खानापूर रेल्वेस्टेशन जवळील मारूती मंदिर परिसरात वनमहोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी भाजप नेते अँड.चेतन मणेरीकर यानी प्रास्ताविक केले.तर भाजपा राज्य कार्यकरणी सदस्य प्रमोद सूर्यकांत कोचेरी यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी,खानापूर तालुक्याचे आमदार आदीच्या हस्ते वक्षारोपण करण्यात आले.


यावेळी बोलताना खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी म्हणाले, प्रत्येकाने एक तरी झाड लावुन ते जगवणे ही आजच्या काळाची गरज आहे.तेव्हा काळजी पूर्वक झाडे लावा.निसर्ग जगवा, आज झाडे कमी झालेत त्यामुळे निसर्गात बदल झाला.आजुन पावसाचा पत्ता नाही. यासाठी प्रत्येकाने याचा विचार करणे गरजेचे आहे.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान नरेंद्र मोदीनी भारत देशाच्या प्रगतीसाठी आहो रात्र कार्यरत आहेत.त्यामुळे भारत देशाच्या विकासाची वाटचाल सुरू आहे.असे मत प्रगट केले.

यावेळी भारतीय जनता पार्टीचे राज्य कार्यकरणी सदस्य प्रमोद कोचेरी, बेळगाव जिल्हा भाजपा उपाध्य व माजी तालुका अध्यक्ष संजय कुबल, प्रधान कार्यदर्शी गुंडू तोपिनकट्टी, मल्लापा मारीहाळ, भाजपनेते अँड.चेतन मणेरीकर,भाजप नेत्या सौ.धनश्री सरदेसाई, माजी जिल्हा पंचायत सदस्य भाजप नेते जोतिबा रेमाणी,माजी नगरसेवक आपय्या कोडोळी,नारायण ओगले, भाजप नेते पंडित ओगले, विशाल सावंत,भरत गोरे( गर्लगुंजी), गजानन पाटील, सुनिल मासेकर,इतर भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
आभार अँड चेतन मणेरीकर यानी मानले.


Recent Comments