Khanapur

नंदगड येथे ‘इस्तिमा’ धार्मिक मेळाव्याची जय्यत तयारी

Share

खानापूर तालुक्यातील नंदगड येथे तालुकास्तरीय मुस्लिम बांधवांच्या पवित्र ‘इस्तिमा’ मेळाव्याची जय्यत तयारी सुरू आहे. इस्लाम धर्माचे धर्मगुरू आणि ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी स्थानिक नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे.

नंदगड येथील रामापूरमध्ये असलेल्या एनआरई संस्थेच्या मैदानावर हा तालुकास्तरीय धार्मिक मेळावा दोन दिवस चालणार आहे. या मेळाव्यात प्रमुख धर्मगुरू उपस्थित राहून उपस्थितांना विशेष मार्गदर्शन आणि धर्मोपदेश करणार आहेत.

या संदर्भात माहिती देताना मुस्लिम समाजाचे नेते व खाजी गल्ली जमातचे मौलवी महम्मद शफी खाजी यांनी सांगितले की, तालुक्यातील जबाबदार कार्यकर्ते या धार्मिक मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी उत्साहाने काम करत आहेत. खानापूर तालुक्यातील समस्त मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा इस्तिमा मेळावा यशस्वी करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Tags: