Khanapur

खानापूरच्या विवेकानंद पीयू कॉलेजमध्ये ‘फ्रेशर्स डे’ उत्साहात

Share

खानापूर शहरातील श्री स्वामी विवेकानंद कला, वाणिज्य आणि विज्ञान पीयू कॉलेजमध्ये नवीन विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी ‘फ्रेशर्स डे’ कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने करण्यात आले. मुख्य अतिथी म्हणून उपस्थित असलेले जीएसएस कॉलेजचे प्राध्यापक प्रणव पित्रे यांनी विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम आणि चिकाटीने अभ्यास करण्याचा सल्ला दिला. या वेळी कॉलेजच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट चेतन मणेरीकर यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवले आणि कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही, अशा शब्दांत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

या प्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे सचिव सुहास कुलकर्णी, ॲडव्होकेट मदन देशपांडे, प्राचार्य पी. के. चापगावकर, उपप्राचार्य एस. एस. पाटील आणि प्राचार्य विनोद मराठे उपस्थित होते. प्राचार्य पी. के. चापगावकर यांनी स्वागत केले, तर उपप्राचार्य एस. एस. पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. याच दरम्यान, कॉलेजच्या प्रयोगशाळेसाठी ३२ हजार रुपयांची देणगी दिल्याबद्दल उपप्राचार्य एस. एस. पाटील यांचा विशेष सन्मान करण्यात आला. कॉलेज युनियनच्या अध्यक्षा उज्ज्वला बाचोळकर यांनी शेवटी आभार मानले.

Tags: