Bailahongala

महापुरुषांचे केवळ फोटो पूजण्यापेक्षा त्यांचे विचार आचरणात आणा : चेतन अहिंसा

Share

प्रसिद्ध चित्रपट अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते चेतन अहिंसा यांनी बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल शहराला भेट देऊन समतावादी समाज आणि संविधानाच्या आशयाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यव्यापी जनजागृती मोहीम राबवत असल्याचे स्पष्ट केले.

बैलहोंगलमधील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना चेतन अहिंसा यांनी संविधानाची मूल्ये तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्यातील विविध भागांत संघटनात्मक बांधणी केली जात असल्याची माहिती दिली. राज्याचा विकास केवळ बेंगळुरूपुरता मर्यादित न ठेवता कित्तूर कर्नाटक, कल्याण कर्नाटक, मध्य कर्नाटक आणि उत्तर कर्नाटक भागालाही समान संधी आणि पायाभूत सुविधा मिळाल्या पाहिजेत, अशी मागणी चेतन अहिंसा यांनी केली. उत्तर कर्नाटकच्या सर्वांगीण विकासासाठी सरकारने विशेष योजना आणि रोजगार उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे मत चेतन अहिंसा यांनी व्यक्त केले.

शेतकऱ्यांच्या जमिनींचे संपादन आणि वाढत्या प्रादेशिक असमानतेबद्दल चिंता व्यक्त करत चेतन अहिंसा यांनी गरीब, शेतकरी, कामगार आणि महिलांना न्याय मिळवून देणारी व्यवस्था निर्माण करण्याची मागणी केली. महापुरुषांच्या प्रतिमेला केवळ हार घालण्यापेक्षा त्यांचे आदर्श प्रत्यक्ष जीवनात अंगीकारणे अत्यंत महत्त्वाचे आहे, अशी प्रतिक्रिया चेतन अहिंसा यांनी व्यक्त केली. जातीवर आधारित असमानता दूर करून विचारधारेवर आधारित नेतृत्व निर्माण करण्याची गरज असल्याचे मत चेतन अहिंसा यांनी व्यक्त केले. या प्रसंगी दलित संघर्ष समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: