बैलहोंगल शहरात हिंदू-मुस्लिम सलोख्याचे प्रतीक असलेल्या हजरत सय्यद हाफीज बरी शाह वली यांचा पवित्र संदल आणि उरूस सोहळा उद्या संध्याकाळी साजरा होणार आहे.


बैलहोंगलमधील मोठ्या तलावाशेजारी असलेल्या पवित्र दर्ग्यात हा धार्मिक कार्यक्रम होणार असून यामध्ये सुफी संत, धर्मगुरू आणि हजारो भाविक सहभागी होणार आहेत. देशातील सुख-शांती, सलोखा आणि प्रगतीसाठी या वेळी विशेष प्रार्थना केली जाईल. आणि त्यानंतर महाप्रसादाचे वाटप केले जाईल. याच सोहळ्यात पवित्र हज यात्रा पूर्ण करून परतलेले हाजी, विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि धर्मगुरूंचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

या संदल आणि उरूस सोहळ्यात हिंदू-मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हजरत हाफीज बरी शाह वली बाबांचा आशीर्वाद घ्यावा, असे आवाहन हजरत हाफीज बरी शाह वली खानका व मशीद समिती आणि दर्गा उरूस समितीने केले आहे.


Recent Comments