Bagalkot

बागलकोटमध्ये सरकारी अधिकाऱ्याला मारहाण केल्याने खळबळ

Share

बागलकोटमधील बीटीडीए कार्यालयातील अधिकारी नीलकंठ अंकद यांना एका शेतकऱ्याने चपलेने मारहाण केली. या घटनेच्या निषेधार्थ कार्यालयातील कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबाने काळ्या फिती बांधून कचेरीसमोर आंदोलन केले.

कार्यालय परिसरामध्ये जमलेल्या कर्मचाऱ्यांनी मारहाण करणाऱ्या बसप्पा दोड्डमणी या शेतकऱ्याच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत तीव्र संताप व्यक्त केला.

या घटनेमुळे भावनाविवश झालेल्या पीडित कर्मचाऱ्याच्या मुलीने, वडिलांची चूक नसताना केवळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटायला सांगितल्याने चपलेने मारहाण झाल्याचे सांगत न्यायाची मागणी केली.

स्वतःवर झालेल्या अन्यायाबाबत बोलताना अधिकारी नीलकंठ अंकद यांनी, त्या फाईलशी आपला संबंध नसताना शेतकऱ्याने लाचेचा खोटा आरोप करत चपलेने मारहाण आणि शिवीगाळ केल्याचे सांगितले. या घटनेमुळे मानसिक धक्का बसल्याचे नमूद करत त्यांनी आरोपीवर कडक कारवाईची मागणी केली.

Tags: